नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
नोएडा -
उत्तर प्रदेशातल्या जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (दि. २५) करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. हे आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. 
उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे, जिथे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असतील. नोएडा विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज झाले की, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची बरीचशी हवाई वाहतूक नोएडाकडे वळवली जाणार आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा 2023-24 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. ज्यानंतर काही प्रमाणात उड्डाणे सुरू होऊ शकतील.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर भारताचे लॉजिस्टिक गेटवे असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानाच्या दुरुस्ती, देखभाल आणि ऑपरेशनचे सर्वात मोठे केंद्र असेल. 40 एकर जागेत विमानाची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल करण्याची सुविधा उभारण्यात येणार असून, त्यातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी हब असेल. या विमानतळामुळे एक लाखाहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान सांगितले. येत्या काही दिवसांत येथे 34,000 कोटींहून अधिक गुंतवणूक होणार आहे. जेवर विमानतळ रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि बस सेवेने जोडले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.