रेमडेसिवीच्या काळाबाजार प्रकरणी भाजप सलग्न नगरसेविकेच्या मुलाला अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रेमडेसिवीच्या काळाबाजार प्रकरणी  भाजप सलग्न नगरसेविकेच्या मुलाला अटक

भाजप सलग्न नगरसेविकेच्या मुलाकडून रेमडेसिवीर जप्त

पिंपरी, (प्रबाोधन न्यूज)  - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी चिखलीतील भाजप संलग्न अपक्ष नगरसेविकेच्या मुलाला अटक केली आहे. या प्रकारामुळे पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली असून भाजपाच्या नेत्यांचा रेमडेसिवीरच्या काळ्याबाजारात ‘हात’ आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

वैभव अंकुश मळेकर (वय 20 रा. चिखली) असे अटक केलेल्या नगरसेविकेच्या मुलाचे नाव आहे. वॉर्ड क्रमांक एकच्या अपक्ष तथा भाजप सलग्न नगरसेविका साधना मळेकर यांचा वैभव हा मुलगा आहे. त्याच्या आणि त्याच्या साथीदाराकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

पुणे पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सहा इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम नवनाथ आरवडे (वय 22) आणि वैभव अंकुश मळेकर (वय 20) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

वरील सर्व आरोपींनी रेमडेसिविर इंजेक्शन अवैधरित्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीर रित्या वैध किमतीपेक्षा जास्त किमतीला विक्री करत होते. तसेच डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसतानाही या इंजेक्शनची ते विक्री करताना आढळून आले आहे. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.