पूजा खेडकरांच्या आईची पिस्तुल हातात घेत शेतक-यांना दमदाटी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे , (प्रबोधन न्यूज ) - महागड्या कारवर अंबर दिवा लावून फिरणा-या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या फॅमिलीचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. काल तिची गाडी जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर हिने मी सगळ्यांना आत टाकेन अशी धमकी देत गेट उघडण्यास मज्जाव केला होता. याच मनोरमा खेडकर हिचा शेतक-यांना दमदाटी करतानाचा व्हीडीओ समोर येत आहे.
काल पुण्यात मनोरमा यांच्याकडून पोलिसांना आणि माध्यमाना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पूजा खेडकर यांच्याकडे मोटारीने वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा थकीत दंड आहे. पुणे वाहतूक पोलिस नोटीस घेऊन पूजा खेडकरच्या घरी गेले होते. गेट उघडण्यासाठी खेडकरच्या कुटुंबीयांना आवाज दिला गेला, परंतू पूजा खेडकरच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच खेडकर यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी केली होती. आता मनोरमा यांचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे.
यामध्ये त्या बाऊन्सर सोबत घेऊन शेतक-यांना दमदाटी करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांनी ते एका शेतक-यावर रोखल्याचेही दिसत आहे. जमिनीचा मूळ मालक आणि मनोरमा यांच्यात कोर्टाच वाद सुरु आहे, असे या संभाषणातून स्पष्ट होत आहे. आता बिल्डरच्या बाळाच्या अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आजोबाला आत टाकणारÞे पुणे पोलिस या व्हीडीओवरून मनोरमा खेडकर यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.