गोरेगावमध्ये मनसेचा स्टेज राज ठाकरेंसह कोसळला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गोरेगावमध्ये मनसेचा स्टेज राज ठाकरेंसह कोसळला

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
कार्यकर्त्यांनी पत्रकारांवर राग काढला व धक्काबुक्की केली

मुंबई, दि. 19 - मुंबईमधील गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवजयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाल्याने व्यासपीठ कोसळले. या वेळी राज ठाकरेही व्यासपीठावरच उपस्थित होते. तेही स्टेजसह कोसळले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

व्यासपीठ कोसळ्याचा राग कार्यकर्त्यांनी पत्रकारांवरच काढला

गोरेगावमध्ये आज शिवजयंती व मनसे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान स्टेजवर अनेक मनसैनिकांनी गर्दी केली होती. स्टेजची क्षमता कमी असल्याने हा स्टेज अचानक खाली कोसळला. त्यात राज ठाकरे देखील खाली पडल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेदरम्यान पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली असून, स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आला आहे. राज ठाकरे सुखरुप असून, ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.

मनसे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करते पण आज करू नये असे काही नाही - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे 365 दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

मनसे शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आज व्यासपीठावर भाषणासाठी नाही तर तुमचे दर्शन व्हावे यासाठी आलो आहे. अशी साद त्यांनी मनसैनिकांना घातली.

आज शिवजयंती आहे. मनसे पक्ष शिवजयंती तिथीने साजरी करतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे जेवढे सण येतात. दिवाळी येते गणपती येतात ते तिथीने येतात. गणपती गेल्यावर्षी कोणत्या तारखेला आले ते यावर्षीही त्याच तारखेला येतील असे नाही. कारण ते तिथीने येतात.