रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे खून प्रकरणी SIT गठित
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई (प्रबोधन न्यूज) - कोकणातील पत्रकार शशिकांत वाशिरे यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना फरफट नेऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. शशिकांत वाशिरे हे रिफायरीच्या विरोधात बातम्या देत असल्याने यातून त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, त्यांच्या हत्तेचा देशभरातून निषेध केला जात आहे. विरोधक देखील सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले आहे. त्यामुळे अखेर वाशिरे यांच्या हत्तेचा तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी राजापूर पेट्रोल पंपाबहेर पत्रकार शशिकांत वरीसे यांच्या मोटारसायकलला थार गाडीनं धडक देऊन जखमी केलं होतं. त्यांना काही अंतर पर्यन्त फरफट नेण्यात आले होते. यात वाशिरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या अपघाता प्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत वारीसे हे रिफायनरी विरोधात असल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण देखील तापले आहे. शिवसेनेने तसेच विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला होता. खासदार संजय राऊत यांनी देखील आज सकाळी पत्रकार परिषद घेत वारिसे हत्ते प्रकरणातील आरोपीना अटक करण्याची मागणी केली होती.
यावरून सरकारवर आरोप होत असतांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.