राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान; भाजपाचे पिंपरीत निषेध आंदोलन

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा तिरपागडा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपच्यातर्फे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, पिंपरी चिंचवडच्यावतीने पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा निषेध आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दूर्गे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापूरे, प्रदेश सहसंपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर, दिव्यांग प्रकोष्ठ अध्यक्ष  शिवदास हांडे, कैलास सानप, सुरेश गादिया, सतिश नागरगोजे, दिशान मुखर्जी, दिनेश पाटे, गणेश ढाकणे, विजय शिनकर, सचिन बंदी, निरंजन राऊत, पंकज ठाकूर, विजय पंवार, दत्ता ढेगे, भरत आगणे, खंडूदेव कठारे, स्वाती देशमुख, संजना मराठे, अनघा रुद्रा यांच्यासह भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. प्रसंगी, राहूल गांधी यांच्या निषेधार्त घोषणा देण्यात आल्या.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, गुजरातमध्ये सन २००० मध्ये ओबीसीत आणली असून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला. त्यांनी जातीनिहाय जनगणनेला (कास्ट सेन्सस) विरोध केला कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे, असे बेताल व निर्ल्लज उदगार कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले, राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे, असा आरोप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी केला.

राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहिली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिरफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता, असेही ते म्हणाले.

मनोज ब्राम्हणकर म्हणाले कीराहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीतकारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत