एकनाथ शिंदेंच्या प्रतिशिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एकनाथ शिंदेंच्या प्रतिशिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे.

उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, विजय नहाटा आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे असं काहीतरी पाऊल उचलणार हे स्पष्टच झालं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिशिवसेनाच स्थापन केली आहे. २१ जून रोजी त्यांनी जे बंड पुकारलं होतं त्यानंतर घडलेल्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेतच. अशातच रामदास कदम यांनी आज नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता तेही शिंदे गटात आले आहेत.

दरम्यान, आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.