मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

मुंबई, दि. 28 – संजय पांडे यांची मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पूर्वी राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक होते. तर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलात काही फेरबदल करून काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. 1986 च्या बॅचचे म्हणजेच सर्वात वरिष्ठ असूनही पोलीस महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे यांनी राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे हे एक आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी उचलबांगडी केल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले होते. त्यानंतर हेमंत नगराळे यांची नियुक्त करण्यात आली होती. या बदलीनंतर संजय पांडे यांच्या तुलनेने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले. त्यामुळे पांडे नाराज होते.