रात्रीच्या वेळी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद वाकड पोलिसांची कामगिरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रात्रीच्या वेळी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद  वाकड पोलिसांची कामगिरी

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   रात्रीच्या वेळी बंद दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकाम साईटवर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वाकड पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन, टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) पहाटे तीन वाजताच्या सुमारास थेरगाव डी मार्ट जवळ करण्यात आली.

शाम हरी गाढवे (वय 21, रा. निगडी), अतिश भारत सिरसाट (वय 19, रा. चिंचवड), नवनाथ दिगंबर साठे (वय 35, रा. थेरगाव. मूळ रा. खुडूस, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शुभम सिद्राम कांबळे (वय 19, रा. पिंपरी. मूळ रा. कामटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार करणसिंग उर्फ कल्ल्या चरणसिंग टाक (वय 19, रा. पिंपरी) हा पळून गेला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस गुरुवारी मध्यरात्री वाकड, थेरगाव परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, थेरगाव येथील डी मार्ट जवळ काहीजण संशयितरीत्या थांबले असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी शिताफीने चौघांना पकडले. त्यांचा पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन, तीनचाकी टेम्पो, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे चौकशी केली असता ते वाकड परिसरात बंद असलेली दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून दरोडा घालणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी अतिश शिरसाठ याच्यावर वाकड, पिंपरी, चिंचवड पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. शाम गाढवे याच्यावर तळेगाव दाभाडे, सांगवी, चिंचवड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. करणसिंग टाक याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंतनू नाईकनिंबाळकर, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, अतिक शेख, रमेश खेडकर, गिलबिले, लोखंडे यांनी केली.