‘भव्यता कामातून दिसू द्या, टेबलाच्या लांबी रूंदीमधून नको’
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पोलीस आयुक्तालयात बेसिक रिस्ट्रक्चरिंगचे उशिरापर्यंत काम
पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेताच स्वतःच्या दालनातील टेबलाची अनावश्यक लांबी-रुंदी कमी करत तुमची भव्यता कामातून दिसू द्या, असा संदेश दिला आहे.
स्वकेंद्री न राहता नागरिक केंद्र बिंदू ठेवून काम झाले पाहिजे, अशा शब्दात आयुक्त शिंदे यांनी पहिल्या मजल्यावरील अधिकाऱ्यांचे कान पहिल्याच दिवशी उपटल्याची चर्चा रंगू लागली आहे.
तीन वर्षांपूर्वी महानगपालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या शाळेच्या दोन मजली जुन्या इमारतीतून आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तेव्हा शाळेच्या वर्गात प्राथमिक बदल करून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (गुन्हे), सहायक आयुक्त आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसण्यासाठी दालने तयार करण्यात आली.
मात्र, गेल्या दीड वर्षात पहिल्या मजल्यावरील आयुक्तांच्या कार्यालय आणि अंतर्गत दालन (अँटीचेंबर) मध्ये अनेक इंटेरियर डिझायनिंग चेंजेस करण्यात आले होते. परंतु, आयुक्तालयात नागरिकांना बसण्यास (वेटींग रुम) पुरेशी जागा नाही. तसेच नागरिकांना वाहने लावण्यास जागा नसल्याने ही वाहने प्रमलोक पार्कमधील लोकवस्तीत रस्त्यावर किंवा एमआयडीसीच्या पटांगणाला लागून असलेल्या रस्त्यावर लावावी लागत आहेत; याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नव्हते. एकीकडे दीड वर्षात आयुक्तालयातील पटांगणात असलेली हिरवळ सुकली तर दुसरीकडे अनेकांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले.
मात्र, गेल्या १५ महिन्यात "मी सर्वत्र कसा दिसेन" या अट्टाहासामुळे आयुक्तालयातील दालनातील १२ फुटी टेबलावर लावण्यात आलेली काच, अंतर्गत दालनातील आरसे, चकचकीत टेबल तत्काळ काढून टाकावेत असे आदेश आता नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.
त्यानंतर त्यांच्या कामाच्या पहिल्याच दिवशी दालनातील १२ फुटी टेबल ६ फूट कमी करण्यात आले आहे. तसेच त्यावरील काच आणि उर्वरित टेबल अन्यत्र कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयुक्तालयात रात्री एक वाजेपर्यंत हे काम सुरू होते. आयुक्त शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत थांबून आगामी काळातील कामकाजाची रूपरेषा ठरविल्याचे समजते.
अधिकाऱ्यांनी मला भेटायला यायची गरज नाही. तुम्ही तुमची कामं करत रहा मी येऊन त्याची पाहणी करेन असेही त्यांनी सगळ्या निरीक्षकांना कळविले आहे. पहिल्याच दिवशी आयुक्त अंकुश शिंदे यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त करून द्यायचा तो संदेश सर्व अधिकाऱ्यांना दिला आहे. लवकरच गुन्हेशाखच्या पथकांमध्ये आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या कामकाज वाटपात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(रोहित आठवले यांच्या फेसबुक वॉलवरून)