मनसेच्या कार्यकर्त्यांवर मोक्का लावा – आसिफ शेख

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मनसेच्या कार्यकर्त्यांवर मोक्का लावा – आसिफ शेख

मुंबई, दि. २ मे - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे तसेच त्यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यापूर्वी 16 अटी घातल्या होत्या. मात्र, मनसेच्या वतीने या सर्व अटी पाळल्या गेल्या नाही. तसेच सभेमध्ये आपल्या वक्तव्यातून जाती-धर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र राज ठाकरे यांनी सभेमध्ये भाषण करताना धर्माचा उल्लेख करत मशिदीवरील भोंग्यांवर देखील टीका केली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पोलिस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईमध्ये उद्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांची भूमीका महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीनंतरच या प्रकरणात कायेदशीर कारवाई बाबत निर्णय स्पष्ट होईल.