माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल; अटक होण्याची शक्यता ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या नागपूर, मुंबईतील मालमत्तांवरही टाच आणण्यात आली आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र, देशमुख ईडीसमोर आले नव्हते. यंत्रणाही त्यांचा शोध घेत होती. मात्र, ते यंत्रणांनाही सापडले नाही. त्यामुळे देशमुख नक्की कुठे आहेत? असा सवाल केला जात होता. तसेच देशमुख परदेशात पळून गेल्याचीही चर्चा होती. मात्र, आज अचानक देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. अनेक समन्स बजावूनही ईडीसमोर हजर न झालेले देशमुख आज अखेर ईडी कार्यालयात हजर झाले. त्यामुळे त्यांची आज दिवसभर कसून चौकशी होणार आहे. तसेच त्यांना आज अटक होण्याचीही शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
देशमुखांवर नेमके आरोप काय?
देशमुखांवर ते गृहमंत्री असताना मुंबईचे तत्काली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच आरोप केले होते. सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहून देशमुख यांच्या वसुलीची पोलखोल केली होती. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.
अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते.