त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प पूजा करण्यावरून दोन पुजारी कुटुंबात तुफान हाणामारी 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प पूजा करण्यावरून दोन पुजारी कुटुंबात तुफान हाणामारी 
नाशिक-
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प पूजा करण्यावरून दोन पुजारी कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली. या भांडणात दोन्ही गटातील लोकांनी गावठी पिस्तुल, तलवारी, चाकू, कोयते बाहेर काढले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. 

पोलिसांनी याप्रकरणी वीरेंद्र हरिप्रसाद त्रिवेदी, आशिष वीरेंद्र त्रिवेदी, मनीष वीरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्यप्रसाद तिवारी, आकाश नारायण त्रिपाठी, अनिकेत उमेर तिवारी, सचिन नागेंद्र पांडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी बीट मार्शल सागर पांढरे यांनी फिर्याद दिली आहे. नागपूरहुन आलेल्या एका कुटुंबाला कालसर्प पूजा करायची होती. त्यासाठी एका पुजाऱ्याने 11 हजार रुपये सांगितले. इतकी रक्कम ऐकून भाविक गांगरले. साहजिकच त्यांनी दुसऱ्याकडे धाव घेतली. दुसऱ्या पुजाऱ्याने ही पूजा कमी रकमेत केली. त्यामुळे दोन्ही पुजाऱ्यांमध्ये भांडण जुंपले. ही दोन्ही कुटुंबे हिरावाडी येथे तलवारी, चाकू, हॉकीस्टीक हातात घेऊन एकमेकांना भिडले. गस्तीवर असलेल्या पांढरे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांसमोरच जोरदार हाणामारी सुरू केली.