कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी केली आत्महत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये प्रसिद्ध कलादिग्दर्शक  नितीन चंद्रकांत देसाईंनी   केली  आत्महत्या

  कर्जत , (प्रबोधन न्यूज )  -   प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बुधवारी (2 ऑगस्ट 2023 रोजी) पहाटे चार वाजता गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सफाई कामगार सफाईसाठी त्यांच्या रुममध्ये गेला असता नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

चारवेळा राष्ट्रीय पुस्कार

नितीन देसाई यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ आदी सिनेमांसाठी काम केलं. सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला होता.

शिक्षण

देसाईंनी शालेय शिक्षण वामनराव मुरंजन हायस्कूल, मुलुंड येथे मराठी माध्यमातून झालं. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. 1987 साली त्यांनी चित्रपट सृष्टीमधील कारकीर्द सुरूवात केली.

एन. डी. स्टुडीओची स्थापना

कर्जत येथे मुंबईच्या सीमेवर नितीन देसाई यांनी 2005 साली एन. डी. स्टुडिओची स्थापना केली होती. 52 एकर (21 हेक्टर) मध्ये पसरलेल्या या स्टुडीओचा नंतर रिलायन्स एंटरटेनमेंटने 50 टक्के हिस्सा सुमारे 1.50 अब्ज रुपयांना विकत घेतला होता. राजा शिवछत्रपती या मराठी मालिकेसह टीव्ही मालिका निर्मितीकडे वळलाले. ही मालिका खूप गाजली. मराठीत त्यांनी मे 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बालगंधर्व' या बायोपिकची निर्मिती केली. त्यांनी मराठीतील पाऊल पडते पुढे या रिअॅलिटी टीव्ही शोचीही निर्मिती केली. 

नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट

- परिंदा (1989)
- 1941- ओ लव्ह स्टोरी (1993)
- आ गले लग जा (1994)
- अकेले हम अकेले तुम (1995)
- खामोशीः द म्युझिकल (1996)
- दिलजले (1996)
- माचीस (1996)
- इश्क (1997)
- प्यार तो होना ही था (1998)
- हम दिल दे चुके सनम (1999)
- बादशहा (1999)
- जोश (2000)
- मिशन कश्मीर (2000)
- वन टू का फोर (2001)
- द लेजेन्ट ऑफ भगतसिंग (20002)
- मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2003)
- लगे रहो मुन्नाभाई (2006)
- धन धना धन गोल (2007)
- गॉड तुस्सी ग्रेट हो (2008)
- दोस्ताना (2008)
- वन्स अपॉन टाइम्स इन मुंबई (2009)
- बालगंधर्व (2011)