भोसरीत ‘व्हीजन-२०२०’च्या स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भोसरीत ‘व्हीजन-२०२०’च्या स्वप्नपूर्तीचा आनंदोत्सव



- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अन्‌ भूमिपूजन
- ‘वेस्ट टू एनर्जी’ , ‘प्रधानमंत्री आवास’ प्रत्यक्षात  साकारला
- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांना यश


पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १ हजार ९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी मोशीतील ‘ वेस्ट टू एनर्जी’ आणि प्रधान मंत्री आवास योजना बोऱ्हाडेवाडी प्रकल्पावर प्रत्यक्ष आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
 
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यामार्फत पंतप्रधान आवास योजना, वेस्ट टू एनर्जी अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या शानदार कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १ हजार ९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. यापैकी सुमारे १ हजार ७२० कोटी रुपयांचे प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. त्यामुळे मोदींच्या दौऱ्यात भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रकल्पांचा बोलबाला दिसला.

‘व्हीजन- २०२०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा प्रकल्प हाती घेतला होता. २०१८ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. हा प्रकल्प आता कार्यान्वयीत झाला असून, त्याद्वारे प्रतिदिन १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया आणि १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे समाविष्ट गाव मोशी आणि कचरा डेपो परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ‘व्हीजन-२०२०’ मधील आश्वासनाची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी केला.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन बटन दाबून प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर त्याचवेळी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी आनंद साजरा करण्यात आला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेवक सागर गवळी, कुंदन गायकवाड, विकास डोळस, लक्ष्मण सस्ते, दिनेश यादव, संतोष मोरे, दत्ता गव्हाणे, विनायक मोरे, सागर हिंगणे यांच्यासह मोशी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्पाअंतर्गत १२८८ घरांचा चावीवाटप कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते.

‘व्हीजन-२०२०’ अंतर्गत हाती घेतलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्प पूर्ण झाला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थींना चावी वाटप झाले. तसेच, पिंपरी-चिंचवडचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प हा सर्वोत्तम आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी कौतूक केले. ही निश्चितच पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमाला स्वत: उपस्थित राहता आले, त्याचा अभिमान वाटतो. या पुढील काळात प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शहराला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिक काम करीत राहणार आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.