विधानसभेच्या 288 जागा लढणार; अभिजित बीचुकले यांची मोठी घोषणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विधानसभेच्या 288 जागा लढणार; अभिजित बीचुकले यांची मोठी घोषणा

   पुणे , (प्रबोधन न्यूज ) -  बिग बॉस फेम अभिजित बीचुकले त्यांच्या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे अभिजित बिचुकले यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे बीचुकले यांनी जाहीर केले आहे.  मुलींना दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली आहे. 

अभिजित बिचुकले यांनी विधानसभेला 288 जागा लढणार असल्याचे आज जाहीर केलं आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बालवाडी ते 10 वी पर्यंतचे मुलींना सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली. तशा आशा आशयाचे पत्र देखील बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
पुणे पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांचा दारुण पराभव झाला होता. अभिजीत बिचुकले आणि आनंद दवेंना मतदारांनी नाकारले होते. बिचुकलेंना 5 तर दवेंना 100 मत मिळाली होती. दोघांच्या मतांची संख्या नोटापेक्षाही कमी होती.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं नाव मतदान यादीतून गायब झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. बिचुकले हे उमेदवार असतानाही त्यांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. बिचुकले साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी आले. मात्र नाव नसल्यामुळे त्यांनी गोंधळ घातला होता.