साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमांचे तसेच पर्यावरणपूरक शहरासाठी ५०० झाडांचे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विचार प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
दि. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानका शेजारील प्रांगणात विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृक्षारोपण, परिसंवाद, किर्तन, वाद्यांची जुगलबंदी, कविसंमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असेल.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचार प्रबोधनपर्वानिमित्त आयोजित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वात विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात सकाळी पारंपरिक सनई वादनाने करण्यात येणार आहे. विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळी १०:३० वाजता विविध हलगी पथकाद्वारे “हलगी वादनाची जुगलबंदी” सादर केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा “स्वरचंदन” हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.३० वाजता वेदांग महाजन हे “जागर ,महापुरुषांच्या विचारांचा” हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता विविध बँड पथकांमध्ये “बँड स्पर्धा” रंगणार आहे. दुपारी ४ वाजता अनिकेत जवळेकर यांचा “सुवर्ण लहरी” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ५ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा “लोकशाहीर आणा भाऊ साठे व आद्यक्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बापूराव पवार यांचा “लेखणीचा बादशहा” हा प्रबोधनपार गीतांचा कार्यक्रम होणार असून रात्री ८ वाजता विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता कुणाल कांबळे यांच्या 'अण्णा तुमच्यासाठी' हा प्रबोधनात्मक गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने होणार आहे.
२ ऑगस्ट रोजी विचार प्रबोधन पर्वाच्या दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता सुजित रणदिवे यांचा “सनई आणि सुंदरी यांची जुगलबंदी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता पल्लवी घोले व अमर शेख यांचा “अण्णांची गौरव गाथा तसेच शाहीरी जलसा” हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम राहूल शिंदे, विजय सरतापे व शामल धिमधिमे हे सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये १ वाजता इंडियन आयडॉल फेम, अमोल सकट व ज्योती अवघडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता वर्षा पवार यांचा मराठी लोकगीते, प्रबोधनात्मक गीते हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील मानवतावादी वैचारिक दृष्टीकोन या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये विवेकवादी विचारवंत, अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, संपादक - साप्ताहिक विवेक, मुंबई रविंद्र गोळे, प्रा.डॉ. मिलिंद आव्हाड, जेएनयु, डॉ. धनंजय भिसे, कामगार आयुक्त, पुणे, सतिश देशमुख, प्रा. प्रदिप कदम, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत पाटील, अशोक पालके हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५.४० वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रवादाची प्रेरणा या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, डॉ. रमेश पांडव यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कोमल पाटोळे प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री ८ वाजतागणेश गायकवाड यांच्या “सांस्कृतिक कार्यक्रमाने” प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.
३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता किर्तनकार – ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर “प्रबोधनात्मक किर्तन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता शांताबाई फेम, संजय लोंढे व प्रभू जाचक यांचा “प्रबोधनात्मक गीते” –हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० वाजाता न्यू होम मिनिस्टर फेम, रमेश परुळेकर यांचा खेळ रंगला पैठणीचा तीन प्रमुख बक्षीस समाविष्ट असा विशेष महिलांकरिता कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सिने अभिनेत्री गुरुमित कौर यांचे “महिला मार्गदर्शनपर व्याख्यान” आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता अक्षय डाडर व लखन अडागळे हे “सांस्कृतिक कार्यक्रम” सादर करणार आहेत.दुपारो २.३० वाजता छाया मोरे आणि पार्टी यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि वंचित समाज विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र, पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेजचे डॉ. आनंद काठीकर, वाडिया कॉलेजच्या डॉ. वृषाली रणधीर, डॉ. बबन जोगदंड, यशदा, पुणे व संदिपान झोंबाडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी सायं. ५.३० वाजतासंगीतमय रामलिंग जाधव यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७. वाजता वर्षा रायकर यांचा पारंपरिक लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता राजू जाधव व रविंद्र खोमणे यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.