भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो ! महाडीकांनी मानले जगतापांचे आभार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो ! महाडीकांनी मानले जगतापांचे आभार

चिंचवड, (प्रबोधन न्यूज) - “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो”, असे म्हणत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले. या वेळी नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक यांना गहिवरून आले. खासदार महाडीक यांनी विजयानंतर शनिवारी रात्री पिंपळे गुरव येथील आमदार जगताप यांच्या निवास्थानी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

लक्ष्मणभाऊंमुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला, अशी प्रांजळ भावना महाडीक यांनी या भेटीत दिली. “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, अशा शब्दांत त्यांनी जगतापांचे आभार मानले.

"तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू कराल," अशी प्रार्थना त्यांनी केली. पिंपरी-चिंचवड पालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्व प्रकारची मदत मी करणार असल्याचा शब्द महाडीक यांनी यावेळी जगताप यांना दिला. जगतापांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर महाडीक शनिवारी रात्री थेट पिंपळेगुरवमध्ये आले. त्यांनी जगतापांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे जगताप कुटुंबियांच्या वतीने औक्षण करून अभिनंदन करण्यात आले.