तब्बल 4 हजार विद्यार्थ्यांना तांत्रीक त्रुटीचा फटका डीबीटीद्वार बॅंक खात्यात पैसे जमा झाले नसल्याची माहिती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तब्बल 4 हजार विद्यार्थ्यांना तांत्रीक त्रुटीचा फटका   डीबीटीद्वार बॅंक खात्यात पैसे जमा झाले नसल्याची माहिती
   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात सेवा पुरविण्याऐवजी त्या वस्तूंची बाजारभावाप्रमाणे असणारी किंमत त्यांना थेट हस्तांतरीत (डीबीटी) करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली. परंतु, बॅंकेतील तांत्रीक त्रुटी आणि पालिकेच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे पहिल्या टप्प्यात रक्कम जमा करण्यात आलेल्या 21 हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल 4 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शालेय साहित्य खरेदीसाठी डीबीटीव्दारे इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थीतील विद्यार्थ्यांना सरासरी 3,500 आणि इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना 3 हजार 700 रुपये इतकी रक्कम बॅंक खात्यात जमा केली जाते.त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 21 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीची रक्कम जमा झाली केल्याचा दावा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. दरवर्षी, सुमारे 43 हजार विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य देण्यात येते होते. मात्र, राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू रुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, आता रोख थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पुर्वी दप्तर, शूज-मोजे, वह्या, टॅब, व्यवसायमाला पुस्तके यासह अन्य शालेय साहित्य खरेदीे प्रस्तावावर मान्यता घेऊन शिक्षण विभागातून शालेय साहित्य खरेदीवर करोडो रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर यावर्षीपासून डीबीटी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
प्राथमिक आणि माध्यमिकच्या एकूण 43 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षण विभागाने 21 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा केली. मात्र, त्यातील 4 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा झालीच नसल्याची माहिती समोर आली. त्याची माहिती घेतल्यानंतर तांत्रिक त्रुटींमुळे ही रक्कम जमा झाली नसल्याची बाब उघड झाली आहे. पैसे पाठविले असताना ते जमा न होण्यास शिक्षण विभागातील अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप पालक वर्गातून केला जात आहे. शिवाय, उर्वरीत 22 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाईल, असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना बॅंक खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून शालेय दप्तर (सॅक), बूट व मोजे, पीटी बूट व मोजे, कंपास पेटी, फूटपट्टी, वॉटर बॉटल, व्यवसायमाला, प्रयोगवही, चित्रकलावही, भूगोल, नकाशा वही, शालेय वह्या, रेनकोट आदी साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 21 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यात आली. मात्र, काही तांत्रिक त्रुटींमुळे त्यातील 4 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. पुन्हा नव्याने रक्कम जमा केली जाईल.
विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त