प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांसाठी सहकार आयुक्‍तांची नियुक्ती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांसाठी सहकार आयुक्‍तांची नियुक्ती
पिंपरी-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते 25 फेब्रुवारीला सुनावणी घेणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी याबाबतेच आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना आदेश दिले आहेत. प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तीन दिवसांमध्ये महापालिका प्रारुप आराखड्यावर तीन हरकती आल्या आहेत. या हरकतींवर कवडे यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घ्यावी. या हरकतींवर 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या वेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आधिकारी यांच्या समक्ष अथवा आयुक्त नसल्यास उपायुक्त दर्जाच्या समकक्ष अधिकाऱ्याच्या उपस्थितीत सुनावणी घ्यायची आहे.

2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रारुप प्रभागरचेनेवर तीन हरकती आल्या असून मुदतीच्या शेवटच्या दिवसांमध्ये जास्त हरकती येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.