पाच क्विंटल गव्हाचा अपहार; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पाच क्विंटल गव्हाचा अपहार; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   गव्हाचे वजन करून ते कंपनी त ठेवण्यासाठी ट्रकमध्ये भरून दिले असता ट्रक चालकाने पाच क्विंटल गव्हाचा अपहार केला. ही घटना शुक्रवारी (दि.  21) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.

शिवेश शामबिहारी सिंह (वय 34, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक अनवर लतीफ शेख (वय 45, रा. येवलेवाडी, कात्रज), पिकप (एमएच 14/एफटी 6064) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भांबोली येथील गोडाऊन मधून ट्रान्सपोर्टच्या ट्रक (एमएच 12/पीक्यू 1702) मध्ये एका कंपनीच्या मालकीच्या 50 किलो वजनाच्या 540 गोण्या वजन करून सावरदरी येथील कंपनीत नेण्यासाठी भरून दिल्या. त्यावेळी आरोपी ट्रक चालकाने धान्याचा ट्रक घेऊन जात असताना भांबोली फाटा ते एचपी चौक यादरम्यान ट्रक मधून 16 हजार रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या दहा गोण्यांचा अपहार करून त्या पिकपमध्ये भरल्या. हा प्रकार सुरू असताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.