शहरातील स्वच्छतागृहांची माहिती मोबाईल अॅपवर मिळवण्यासाठी टॉयलेटसेवा अॅपचा लोकार्पण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शहरातील स्वच्छतागृहांची माहिती मोबाईल अॅपवर मिळवण्यासाठी टॉयलेटसेवा अॅपचा लोकार्पण

   पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -   शहरातील नागरिकांसाठी आवश्यक सोईसुविधा पुरविण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते, आज सुरू करण्यात येत असलेल्या ‘’टॉयलेटसेवा’’ ऍपद्वारे केवळ शहरातील नव्हे तर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी, नागरिक, व्यावसायिक तसेच प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यांसह अनेकांना पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छतागृहांची उपलब्धता एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती  आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये शहरातील२३८ सार्वजनिक स्वच्छतागृहांची ठिकाणे, सुविधांसह माहिती असलेल्या उपयुक्त अशा‘टॉयलेटसेवा ऍपचे लोकार्पण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, टॉयलेटसेवा ऍप विकसित करणारे अमोल भिंगे, तसेच त्यांचे सहकारी प्रितम चोपडा, सोनाली चोपडा, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, शितल वाकडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत समन्वयक सोनम देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, बाळासाहेब कांबळे, शांताराम माने, तानाजी दाते, राजू साबळे, राजेश भाट, वसंत सरोदे आदी उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधण्यासाठी तसेच वापरानंतर त्या शौचालयाच्या स्थितीबाबत प्रतिसाद देण्यासाठी, तक्रारी नोंदविण्यासाठी इ. सुविधा उपलब्ध असलेले ‘’टॉयलेटसेवा’’ ऍप तयार केले असून त्यामध्ये शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत माहिती उपलब्ध आहे. तसेच या ऍपद्वारे उपलब्ध स्वच्छतागृहांमधील सुविधा तसेच तृटींबाबत तक्रारी नोंदविता येणार असून त्याची दखल आरोग्य विभागामार्फत घेतली जाणार आहे.