पिंपरीच्या 545 सोसायट्यांमध्ये राबविणार मतदार नोंदणी अभियान निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांची माहिती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरीच्या 545 सोसायट्यांमध्ये राबविणार मतदार नोंदणी अभियान   निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांची माहिती
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - निवडणूक विभागाकडून पिंपरी विधानसभा मतदार संघामधील तब्बल 545 गृहनिर्माण संस्थांमध्ये 22 व 23 जुलै रोजी गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार नोंदणी अभियानाला प्रतिसाद देऊन मतदार यादीतील आपल्या नावाची दुरुस्ती अथवा तत्सम बदल करुन घ्यावेत, असे आवाहन निवडणूक नोंदणी अधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.
राज्याच्या निवडणूक विभागाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी 22 व 23 जुलै 2023 या दोन दिवशी पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये गृहनिर्माण मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या विधानसभा मतदार संघातील 545 गृहनिर्माण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. नवमतदारांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच, नावेही वगळण्यात येणार आहेत.
गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या रहिवाशांची नावे मतदार यादीत समाविष्ट नसतील अशा मतदारांना सोसायटीच्या अध्यक्षांनी कागदपत्रांसह मतदान अधिकाऱ्यांकडे पाठवावे. मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी. ज्या मतदारांना ऑनलाइन नाव नोंदणी करावयाची असेल त्यांना शासनाच्या https://voters.eci.gov.in व व्होटर हेल्पलाइन ऍपच्या माध्यमांचा वापर करुन नवीन नाव नोंदणी नमुना 6, नाव वगळण्यासाठी नमुना 7 व मतदार यादीतील नोंदणी संदर्भातील दुरुस्ती करिता नमुना 8 भरावा, असे आवाहन नोंदणी अधिकारी जळक यांनी केले आहे