A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मेकॅनिकल, फीटर, वर्कर, वेल्डरला मिळतेय अधिक पसंती
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) -पिंपरी-चिंचवड महापालिका आणि टाटा मोटर्स यांच्यात गेल्या महिन्यात तांत्रिक कौशल्याबाबत सामंजस्य करार झाला. मेकॅनिकल मोटार व्हेईकल, फीटर, पेंटर (जनरल), शीटमेटल वर्कर, वेल्डर आदी ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाटाकडून सहा महिने किंवा एक वर्ष कालावधीसाठी जॉब करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मोरवाडीतील महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांची वरील ट्रेडला पहिली पसंती मिळत आहे.
आयटीआयमध्ये सध्या 14 ट्रेड सुरु असून त्यापैकी इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटार व्हेईकल मेकॅनिकल आदी प्रमुख ट्रेडला विद्यार्थ्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. आयटीआयमध्ये नव्याने 25 ते 30 ट्रेड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यानंतर कंपन्यांच्या सहयोगाने हे ट्रेड सुरू केले जाणार आहेत. आयटीआयमध्ये एकूण 14 ट्रेड शिकविले जातात. त्याच्या 36 तुकड्या आहेत. एकूण सुमारे 500 जागांवर विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जातो. तथापि, प्लंबर, शीटमेटल वर्कर या जागांना कमी मागणी असल्याने जवळपास 40 जागा शिल्लक राहतात. वायरमन, आरेखक यांत्रिकी (ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल), रेफ्रिरजरेशन ऍण्ड एसी टेक्निशियन, टर्नर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, वेल्डर आदी ट्रेडलादेखील विद्यार्थ्यांकडून पसंती मिळत आहे.
आयटीआयमधील पाच ट्रेडच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टाटा मोटर्समध्ये सहा महिने ते एक वर्ष कालावधीसाठी ऑन जॉब ट्रेनिंगची संधी मिळणार आहे. मेकॅनिकल मोटार व्हेईकल, फीटर, पेंटर (जनरल), शीटमेटल वर्कर, वेल्डर आदी ट्रेडच्या विद्यार्थ्यांना ही संधी दिली जाणार आहे. या काळात त्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे. ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना अनुभव मिळणार असल्याने ट्रेड उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून देखील काम करता येणार आहे.
प्रशिक्षित विद्यार्थ्यांना संधी
आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी दिली जाते. आयटीआय मार्फत त्यासाठी विविध कारखान्यांमध्ये संपर्क साधला जातो. महापालिकेतसुद्धा काही ट्रेडच्या शिकाऊ उमेदवारीच्या जागा उपलब्ध आहेत. तेथे देखील विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्याचप्रमाणे, विविध कंपन्यांकडून आयटीआयकडे कुशल मनुष्यबळासाठी संपर्क साधला जातो. त्यांच्या मागणीनुसार आयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. तसेच, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार नवीन तंत्रज्ञानावर आधारित 25 ते 30 नवीन ट्रेड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता झाल्यानंतर पुढील दोन वर्षात बांधकाम करून ही कार्यवाही केली जाणार आहे. त्याशिवाय, शासनाच्या योजनांतर्गत लघुउद्योगांना जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वर्क सेंटर सुरू करता येईल. त्याचा लघुउद्योग व आयटीआय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.