संसदेचं कामकाज सुरू असताना २ जण शिरले, एक जण महाराष्ट्रातील

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संसदेचं कामकाज सुरू असताना २ जण शिरले, एक जण महाराष्ट्रातील

नवी दिल्ली , (प्रबोधन न्यूज )  -  संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसम सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून दोन जण सभागृहात शिरले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते.

लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोनजण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते खाली प्रेक्षक गॅलरीतून आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

दरम्यान, आजच्याच दिवशी २२ वर्षापूर्वी म्हणजे १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्यावेळीही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत . बरोबर २२ वर्षानंतर आजच दोनजण संसदेत शिरल्याने खळबळ उडाली आहे.