दहावीचा निकाल जाहीर, यंदा 96.94 टक्के निकालासह मुलींची बाजी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यात यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,84,790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,68,977 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94 आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90 अशी आहे.
राज्यातील 22,921 माध्यमिक शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12,210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6,50,779 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 5,70,027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 2,58,027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 42,170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेस राज्यातील नऊ मंडळामधून एकूण 8169 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8029 दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 7579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.40 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 54,159 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 52,351 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 41,390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 79.06 आहे.
दहावीचा विभागवार निकाल :-
१) पुणे 96.96
२) नागपूर 97.00
३) औरंगाबाद 96.33
४) मुंबई 96.94
५) कोल्हापूर 98.50
६) अमरावती 96.81
७) नाशिक 95.90
९) लातूर 97.27
१०) कोकण 99.27
दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे.
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
१) निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
२) त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
३) त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
४) निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.