काँग्रेसच्या धंगेकरांची विजयाची दिशेने घौडदौड; भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

२५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाला काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सुरूंग लावत विजयाची घोडदौड चालू ठेवली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

काँग्रेसच्या धंगेकरांची विजयाची दिशेने घौडदौड; भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

पुणे – सन २००९ पासून कसबा विधानसभा मतदारसंघाने भाजपचा विजय पाहिलेला आहे. खासदार गिरीश बापट यांनी या मतदारसंघात सतत विजयश्री खेचून आणली होती. ते खासदार झाल्यानंतर कै. मुक्ता टिळक हे या मतदारसंघातून आमदार झाले. २५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाला काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सुरूंग लावत विजयाची घोडदौड चालू ठेवली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर हे आघाडीवर राहिले आहेत. आतापर्यंत मतमोजणीच्या १५ फेऱ्या झाल्या असून, धंगेकर यांना ५६ हजार ४५७ मते पडली असून, भाजपचे हेमंत रासने यांना ५० हजार ४९० मते पडली आहेत. भाजपची जी मदार पेठांवर होती म्हणजे सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ इथेही रासने यांना धंगावर लीड घेता आले नाही. मतमोजणी राहिलेले उरलेले भाग म्हणजे गंज पेठ, घोरपडे पेठ, रविवार पेठ या भागावर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे धंगेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी कालच धंगेकर यांना विजयी घोषित करून बॅनर लावले होते. ते आता खऱ्या अर्थाने सार्थ ठरताना दिसत आहे. धंगेकर हे सामान्य कार्यकर्ता व नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तीन वेळा ते निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे आता जनतेनेच त्यांना आमदार करावयाचे ठरवलेले दिसते आहे.

भाजपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालक मंत्री इथे विजयासाठी ठाण मांडून बसले होते. तरीही पराभव होत असेल तर भाजपला विचार करण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे संपूर्ण देशात काँग्रेसची घसरण होत असताना भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आहे ही मोठी घटना मानली जात आहे.

या पोटनिवडणुकीत पुढील राजकारणाची दिशा दडली होती. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीची रणनिती बदलावी लागणार हे निश्चित.