रेल्वे अधिकाऱ्याच्या बदलीमुळे आनंदनगर झोपडपट्टीधारकांना मिळाला दिलासा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रेल्वे अधिकाऱ्याच्या बदलीमुळे आनंदनगर झोपडपट्टीधारकांना मिळाला दिलासा

पिंपरी-चिंचवड, दि. २७ एप्रिल – आनंदनगर झोपडपट्टी ही चिंचवड येथील रेल्वेच्या जागेवर वसली आहे. येथे सुमारे १५ हजार नागरिक राहतात. झोपडपट्टीधारकांना रेल्वे खात्याकडून जागा रिकामी करण्यासाठी नोटिसा येत असतात. नुकतेच रेल्वे अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत जागा रिकामी करा अशी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु ज्या अधिकाऱ्याने नोटीस बजावली त्यांचीच मुंबईला बदली झाल्याने नागरिकांनी निःश्वास सोडला आहे.

अमृत आनंद, सहायक मंडल, लोणावळा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना बढती मिळून त्यांची मुंबईला बदली झाली आहे. त्यामुळे १५ हजार नागरिकांवर बेघर होण्यापासून सुटका मिळाली आहे. गेल्या २० दिवसांपासून नागरिक चिंतेत होते. रेल्वेने नुकतीच खडकी येथील रेल्वेच्या जागेवर वसलेली झोपडपट्टी खाली करून घेतली होती. त्यामुळे नागरिक अधिकच चिंताग्रस्त झाले होते.

झोपडपट्टी धारकांचे शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पुनर्वसनाची मागणी केली होती. आयुक्तांनीही परिस्थिती पाहून रेल्वेचे डीआरएम रेणू शर्मा यांना एक पत्र पाठवून नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. परंतु या पत्रात नेमका किती कालावधी अपेक्षित आहे हे नमूद केले नव्हते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आयुक्तांना पत्र पाठवून नेमका किती कालावधी हवा आहे अशी विचारणा केली होती.

चार दिवसांपूर्वी पुण्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आले होते. त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांची भेट घेऊन आनंदनगर झोपडपट्टी पुनर्वसनप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती व कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. दानेव यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन लक्ष घालतो असे सांगितले होते.

दरम्यान, अमृत आनंद यांची अचानक मुंबईला बदली झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अमृत आनंद हे उत्तम अधिकारी व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचे आपल्या सहकाऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध होते. त्यांना बढती मिळून मुंबईला बदली झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देत सहकाऱ्यांनी निरोप दिला.