महाबळेश्वरला 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महाबळेश्वरला 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा
मुंबई -  
येत्या काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 

महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्यव्यापी मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वतः अजित पवार आणि शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळातील महापालिका निवडणुका तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पुढील वाटचाल यावर या दोन दिवसीय मेळाव्यात चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येईल. विशेष म्हणजे या मेळाव्याचा समारोप 24 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.

आगामी काळातील महापालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजन सुरू केले आहे. शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या स्थानिक नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. तसेच मुंबईतदेखील राष्ट्रवादी पक्ष बळटीकरणासाठी पावले टाकत आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादीने खास जोर लावला आहे.