आमदार महेश लांडगेंचं जयंत पाटलांनी केलं सांत्वन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आमदार महेश लांडगेंचं जयंत पाटलांनी केलं सांत्वन

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजप अध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचं नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यासह कुटुंबियांच्या सांत्वनासाठी भोसरीतील त्यांच्या निवास्थानी राज्यभरातून सर्वच पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे.

आमदार महेश लांडगे यांचे सर्वपक्षीय चांगले संबंध असल्याने त्यांच्या घरी पक्षभेद, मतभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची राज्यभरातून सांत्वनासाठी रांग लागली आहे. गेले चार दिवस ती कायम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेचच आपल्या या आवडत्या पैलवान आमदाराला भेटून गेले. त्यानंतर भाजपच्या इतर नेतेमंडळीची रांग लागली. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांत्वन करून गेले. यावेळी विधान परिषद सदस्या उमा खापरे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे आदी हजर होते. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि फायरब्रॅण्ड नेत्या चित्रा वाघ या सुद्धा काल लांडगेंना भेटून गेल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीसाठी आलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही वेळ काढून लांडगेंच्या घरी काल गेले. त्यांनी आस्थेने लांडगे व कुटुंबियांची विचारपूस केली. त्यांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला. यावेळी भोसरीचे प्रथम आमदार, राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे, पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर स्थानिक पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनीही लांडगेंची भोसरी निवासस्थानी काल त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.