लेशपाल म्हणतो, 'तरुणीचा हल्ला अंगावर घेतला अन् रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो'
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे , (प्रबोधन न्यूज ) - सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे याचं सगळीकडे कौतुक होत आहे. हे कौतुक पाहून त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत, पण ती घटना घडली, तेव्हा रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला सत्काराला बोलावू नका, अशी प्रतिक्रिया लेशपाल याने दिली आहे.
लेशपालची इंस्टा पोस्ट चर्चेत
पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्या मित्राकडून झालेल्या कोयता हल्ल्यातून तिला वाचवण्याचं धाडस लेशपाल जवळगेनं नुकतंच केलं. त्यानंतर लेशपालवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. त्याचे सत्कार सुरु आहेत. एकीकडे लेशपालला शाबासकी असताना दुसरीकडे त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर जातीयवाद्यांना कंठ फुटला. कारण लेशपालच्या एका पोस्टवर काही जणांनी त्या तरुणीची आणि हल्लेखोराची जात विचारण्याचा कहर केला. त्यानंतर लेशपालनं आपल्या इन्स्टा अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. त्यात लेशपाल म्हणतो की, मुलीची आणि मुलाची जात कुठली होती, असं मेसेज करुन विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता, ना ही समाजाचे. तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला कीड लागली आहे, असंही लेशपालनं लिहिलंय.