पुणे पोलिसांच्या ‘त्या’ मास्टर प्लॅनवर अजित पवारांची टीका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे पोलिसांच्या ‘त्या’ मास्टर प्लॅनवर अजित पवारांची टीका

पुणे (प्रबोधन न्यूज) - गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयता गँगच्या या  दहशतील आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन आखला आहे. याच मास्टर प्लॅनवर आज राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये’, असे अजित पवार यांनी सांगितले.

 “एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये”, असे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे शहरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. तरुण हातात धारदार शस्त्रे (कोयता) घेऊन दहशत पसरवताना दिसत आहेत. तसेच याशिवाय चोरटे धारदार शस्त्रे दाखवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धमकावतात त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगने धुमाकूळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे. या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.