अलंकापुरीत महाराजस्व अभियानात लोकसहभागाने शिबीर यशस्वी आमदार मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आळंदी (प्रबोधन न्यूज ) - राज्य शासनाचा शासन आपल्या दारी या उपक्रमाचा भाग असलेले महाराजस्व अभियान आळंदीत उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याने अधिक लोकांची कामे वेळेत व्हावी यासाठी पुन्हा एकदा या भागात हा उपक्रमालाबंविला जाईल. यातून लाभार्थी यांना लाभाच्या योजनांचा लाभ दिला जाईल असे खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी सांगितले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनात आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने जनजागृती करीत शासन आपल्या दारी या उपक्रमात महाराजस्व अभियान आळंदीत आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार मोहिते पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.
या अभियानचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे हस्ते फीत कापून उदघाटन झाले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपाध्यक्ष विलास घुंडरे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, डी.डी.भोसले पाटील, योगेंद्र कुऱ्हाडे, साहेबराव कुऱ्हाडे, अनिकेत कुऱ्हाडे, सचिन घुंडरे, दमयंती कुऱ्हाडे, माजी नगरसेविका मालन घुंडरे, मंगला वेलकर, सुशीला कुऱ्हाडे, शारदा गोरे, पुष्पाताई कुऱ्हाडे, उषाताई नरके, मालती कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, रुपाली पानसरे, वैष्णवी रंधवे,राणी रंधवे, लताताई मिंढे, माऊली घुंडरे, नंदकुमार वडगावकर, निखिल बनसोडे, संकेत पाटील, दादासाहेब नाळे, आरिफ शेख, बापू कुऱ्हाडे, उज्वला चौधरी, गौरी गोळे आदींसह नागरिक, लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी आळंदी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, वीज वितरणाचे कनिष्ठ अभियंता सुभाष धापसे, आळंदी ग्रामीण रुग्णलायच्या कविता उभे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, तेजस्विनी साठे, नायब तहसीलदार मदन जोगदंड, आळंदी नगरपरिषद विभाग प्रमुख मनोज राठोड, अर्जुन घोडे, यांचेसह विविध शासकीय खात्यातील संबंधित विभाग प्रमुख यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.
या महाराजस्व अभियान मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमात तीनशेवर ग्रामस्थानी सहभागी होत शिबिरास प्रतिसाद दिला. या शिबिरात ६७ उत्पन्न दाखले, ५४ नवीन रेशनकार्ड, ३८ दुबार रेशन कार्ड, ७८ मतदार नाव नोंदणी अर्ज, २० संजय गाधी निराधार योजनेचे फॉर्म. ८९ आधार कार्ड लिंक,१० लग्न प्रमाणपत्र, १२ जन्म मृत्यू दाखले आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे माध्यमातुन देण्यात आले. या उपक्रमाचा लाभ आळंदी शहरातील नागरिकांना झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांनी अभियानचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.