दगडाने भरलेल्या डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दगडाने भरलेल्या डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -       भरधाविकात जाणाऱ्या दगडाने भरलेल्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार डंपरखाली चिरडला गेला. यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी दहा वाजताच्या सुमारास मोशी आळंदी रोडवर घडली.

संतोष सुभाष वाघमारे (वय 36) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मावस भाऊ किशोर मोहन वाघमारे (वय 32, रा. चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/एचजी9255) चालक सुरेश भुजंगा कचरे (वय 40, रा. सस्ते चाळ, मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मावस भाऊ दुचाकीवरून मोशी आळंदी रोडने जात असताना दगडाने भरलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांचा मावस भाऊ संतोष वाघमारे हे डंपरखाली चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.