'शक्ती कायद्या'चे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेकडून स्वागत 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'शक्ती कायद्या'चे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेकडून स्वागत 
पिंपरी -
महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेकडून आज (शुक्रवारी) पिंपरीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कायद्याचे स्वागत केले तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या या आनंदोत्सवात जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेविका मीनल यादव, शशिकला उभे, आशा भालेकर, सरिता साने, कल्पना शेटे, कामिनी मिश्रा, शिल्पा अनपन, संगीता टुपके, भारती चकवे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी महिला अत्याचार, बलात्कार, व ऍसिड फेकीच्या गुन्ह्यात फाशी व कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा विधानसभेत पारित केला. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षा कवच मिळाले आहे. असा कठोर कायदा केल्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगत सर्व महिलांच्या वतीने सुलभा उबाळे यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

या कायद्यात समाजमाध्यमांवर महिलांची बदनामी, अ‍ॅसीड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत. तर सारे खटले एका महिन्यात निकाली काढणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालये स्थापन करणे या गोष्टींचा समावेश आहे.