मावळातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या, पावसाळापूर्व कामे पूर्ण करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - मावळ तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती द्यावी. कामाचा दर्जा चांगला ठेवावा. चुकीचे काम करणा-यांची गय केली जाणार नाही असा इशारा देतानाच पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील सर्व गावांमधील खड्डे बुजावेवत अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या आहेत.
मावळ तालुक्यातील विविध विकास कामे, पावसाळापूर्व कामांसंदर्भात खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) आढावा बैठक घेतली. पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला तहसीलदार विक्रम देशमुख,गट विकास अधिकारी सुधिर भागवत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, विशाल हुलावळे, दत्ता केदारी, धनंजय नवघने, मुन्ना मोरे, प्रवीण ढोरे उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत ११४ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे चालू आहेत. या योजनेत ५० टक्के केंद्र तर ५० टक्के राज्य सरकारचा सहभाग आहे. या कामाच्या दर्जाबाबत काही सरपंचांनी तक्रारी केल्या आहेत. कोणी चुकीचे काम करत असेल. तर, त्याची गय केली जाणार नाही. या संपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक घेतली जाईल. चुकीच्या काम करणा-या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल.
पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील सर्व गावांमधील रस्त्यांवरील खड्डे बुजावावेत. पावसाळ्यात लाईट जाणार नाही याची विद्युत विभागाने काळजी घ्यावी. तारांवर आलेल्या फांद्या काढाव्यात. जीर्ण झालेले पोल बदलावेत. पुणे जिल्हा नियोजन मंडळातून मंजुर झालेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवून घ्यावेत. पावसाळ्यात वीज खंडीत होणार यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात. वन खात्याने व्यवस्थित मोजमाप घेवून रोपांची लागवड करावी. ग्रामपंचायत पातळीवर कच-याची विल्हेवाट लावावी. रस्त्यावर कचरा टाकू देवू नका, पवना, इंद्रायणी नदी मावळातून वाहते. नदी स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची बैठक घ्यावी. मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी नदी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी अशा सूचना खासदार बारणे यांनी तहसीलदारांना दिल्या.