निगडी क्लबच्या अध्यक्षपदी अलूरकर तर सचिवपदी मानगे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

निगडी क्लबच्या अध्यक्षपदी अलूरकर तर सचिवपदी मानगे

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - प्रणिता अलूरकर यांची रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी, तर केशव मानगे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांतपाल डॉ. अनिल परमार, सहाय्यक प्रांतपाल प्रकाश जेठवा आणि रोटरी जगतातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न झाला.

2022-23 या वर्षासाठी नियुक्त केलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे -

जगमोहन सिंग, शशांक फडके, कमलजीत दुल्लत, श्रीकृष्ण करकरे, रवी राजापूरकर, सविता राजापूरकर, जयंत येवले, शीतल खिवंसरा, डॉ. रवींद्र कदम, अंकाजी पाटील, गुरदीप भोगल, हरबिंदर सिंग दुल्लत, आरती मुळ्ये, प्रवीण घाणेगावकर, रवी हिरेमठ, डॉ.शुभांगी कोठारी, प्रमोद देशमुख, प्रमोद पाटणकर, सुभाष जयसिंघानी आणि विजय काळभोर यांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना अध्यक्षा प्रणिता अलूरकर म्हणाल्या की, दुर्गा टेकडी येथे मूळ सह्याद्री वृक्षांसह वनस्पती उद्यानाची निर्मिती, शाळांना 3000 बेंच दान, अॅनिमिया शोधून बरा करण्यासाठी आणि ट्रान्सजेंडर्सच्या सुधारणेसाठी एक मेगा मोहीम यांवर भर दिला. गेल्या वर्षी अध्यक्ष जगमोहन सिंग यांनी काही कंपनीच्या सीएसआर निधीच्या मदतीने सुमारे 4.00 कोटी रुपयांचे 44 सार्वजनिक प्रकल्प पूर्ण केले होते.

रोटरी क्लब ऑफ निगडी आता पुणे आणि पीसीएमसी कंपन्यांसाठी त्यांचे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व प्रकल्प राबविण्यासाठी पसंतीचे भागीदार आहे.