बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांचे शिक्षिकांकडून लैंगिक शोषण

भिवंडी येथील बालसुधारगृहात ४० वर्षीय शिक्षिकेनेच विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचे उघड झाले असून, एका शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांचे शिक्षिकांकडून लैंगिक शोषण

भिवंडी (ठाणे) -  भिवंडी येथील बालसुधारगृहातील ४५ वर्षीय शिक्षिकेने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बालसुधारगृहातील १७ वर्षीय मुलाला १७ आणि २८ सप्टेंबर रोजी महिला शिक्षिकेने शरीर सुखाची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. महिलेने या मुलाला तू  इतर मुलांना भडकाव आणि मास्तरांवर हात उचल तरच तुला शरीरसुख देईन, अशी ऑफर दिली होती. त्यानंतर या शिक्षिकेने मुलाचे लैंगिक शोषण केले.

या प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर मुलांच्या तक्रारीनंतर भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षिकेला काही महिन्यांपूर्वी गैरवर्तनाबाबत निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी निरीक्षण गृहातील कर्मचारी आणि मुलांच्या सुरु असलेल्या सविस्तर चौकशी दरम्यान हे सर्व धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत पुढील चौकशी सुरु आहे.

या दरम्यान याच चाळीस वर्षीय शिक्षिकेने काही अल्पवयीन बालकांचा लैंगिक छळ केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणगृह प्रशासनाकडून संबंधीत शिक्षिकेवर भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. तर यात आणखी एका शिक्षिकेचा समावेश असल्याचा संशय जिल्हा महिला बालविकास विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षिकेचे निरिक्षण गृहातील इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसमवेत वैयक्तिक वाद होते. या वैयक्तिक वादाचा वचपा काढण्यासाठी आणि इतर शिक्षकांना मारहाण करण्यासाठी संबंधित शिक्षिकेने निरीक्षण गृहातील एका अल्पवयीन मुलाला प्रवृत्त केल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. जर ‘तू असे केल्यास तुझ्यासमवेत शरीरसंबंध प्रस्थापित करीन’ अशी लालूच दिल्याची माहिती एका पीडित मुलाने चौकशी दरम्यान जिल्हा महिला बालविकास विभागाचे अधिकारी आणि पोलिसांना दिली आहे.

दरम्यान संबंधित महिला शिक्षिकेने संस्था संचालक आणि बालसुधारगृहाच्या उपाधीक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली आहे. या दोघांनी आठ महिन्यापूर्वी अश्लील व्हिडिओ दाखवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिला शिक्षिकेने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ देखील केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, तेथील शिक्षक व शिक्षिकेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस.ए.इंदलकर यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.