दीड महिन्यात नव्या नवरीचा छळ; नवरीची इंद्रायणीत उडी घेऊन आत्महत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दीड महिन्यात नव्या नवरीचा छळ; नवरीची इंद्रायणीत उडी घेऊन आत्महत्या

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     लग्नाला अवघा दीड महिना झाला असताना नव्या नवरीने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कारणांवरून छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलले असल्याबाबत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) घडली.

कौशल पिराजी भोसले (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत नवविवाहितेच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी कौशल याचा 17 मे 2023 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीकडे माहेरहून पैसे व दुचाकी आणण्याची मागणी केली. तसेच नोकरीचा एक वर्षापासूनचा पगार घेऊन येण्यासाठी तगादा लावला. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ करून शिवीगाळ व हाताने मारहाण केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने लग्नाच्या दीड महिन्यातच इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.