पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )     पत्नीशी घटस्फोट घेतो आणि त्यानंतर तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर महिलेचा दोघांनी संमतीने घर्भापात केला. हा प्रकार 26 जुलै 2022 ते मार्च 2023 या कालावधीत चाकण येथे घडला. 

विकी विजय केळकर (वय 31, रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला 'पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर तुझ्याशी लग्न करतो' असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान फिर्यादी तीन महिन्यांच्या गरोदर राहिल्या. फिर्यादी आणि आरोपी दोघांनी संमतीने गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.