ईडीमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य; आजही राहुल गांधीची चौकशी सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ईडीमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य; आजही राहुल गांधीची चौकशी सुरू

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) – ईडीने राहुल गांधींची काल पासून चौकशी सुरू केलीय. त्यामुळे देशभर काँग्रेसमध्ये संताप पसरला आहे. ईडीविरोधात व भाजपविरोधात काँग्रेसने देशभर आंदोलने सुरू केली आहेत. काँग्रेसने ईडीचे आभारच मानले पाहिजेत की, ज्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता जागा झाला आहे. मरगळलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या पूर्वी जनता पक्षाने माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधींना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे देशभर असाच संताप पाहायला मिळाला होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्तेच काय सामान्य मतदारही रस्त्यावर उतरला होता. आताही तसेच काहीसे घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही म्हणावा तसा विरोध, निषेध होताना दिसत नाही.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने ८.३० तास चौकशी केली. आजही राहुल गांधींना ईडीने हजर राहण्यास सांगीतले आहे. राहुल गांधी दुसऱ्या दिवशी ईडी हजर होण्याआधी काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीचा उल्लेख "निवडणूक व्यवस्थापन विभाग" म्हणून केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आणि राहुल गांधींवरती चौकशी का लागली गेली याचे कारणही सांगितले आहे. “क्रोनोलॉजी समझीये” अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी सरकार विरोधात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुरजेवाला म्हणाले ''राहुल गांधी सतत केंद्र सरकारवर टीका करत असतात, लोकांचा आवाज उठवत असतात म्हणूनच मोदी सरकारने राहुल गांधीवर ईडीच्या माध्यमातून हल्ला केला आहे. जनतेचे प्रश्न सरकारसमोर निर्भिडपणे मांडणाऱ्या विरोधकांच्या निर्भिड आवाजावर हा हल्लाबोल आहे.'' सुरजेवाला यांनी राहुल गांधीची मागच्या काळात केंद्र सरकारला कात्रीत पकडणारी वक्तव्य आपल्या पत्रात व्यक्त केली  आहेत. आणि तोच आवाज दाबण्यासाठी राहुल गांधींवरती चौकशी लावल्याचे ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी चिनी आक्रमण, वाढती महागाई, कोरोना काळ हाताळणे, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगारांची दुर्दशा, शेतकरी आंदोलन आणि भाजपकडून जातीय अशांतता भडकावली जात आहे यावर राहुल गांधी यांनी केंद्राला सतत खडे बोल सुनावले आहेत. सरकार गांधींना घाबरते म्हणून त्यांना 'टार्गेट' केले जात आहे असे रणदीप सुरजेवाला म्हणाले आहेत. काँग्रेसने काल नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत.