पाच वर्षांपासून वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात वडील-मुलगी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येरवडा पोलिसांकडून वडिलांना अटक करण्यात आली आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे - : पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपण लैंगिक अत्याचाराच्या घटना नेहमीच ऐकत असतो. परंतु या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. जन्मदात्या पित्यानेच त्याच्या 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येरवड्यामध्ये घडली आहे. पीडितेची आई पाच वर्षांची असताना तिच्या वडिलांपासून विभक्त झाली. तिच्या वडिलांनी नंतर दुसरे लग्न केले.
या तरुणीच्या वडिलांनी तिला बारावीच्या परीक्षेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती मैत्रिणीकडे शिफ्ट झाली. त्यावेळेस त्यांनी मित्राला तिची व्यथा सांगितली. मित्राने सल्ला सांगून पोलिसांमध्ये तक्रार द्यायला सांगितले. या प्रकरणी तिने रविवारी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अटक केल्याचे येरवडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक उत्तम चाकोरे यांनी सांगितले.
मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे वडील शारीरिक अत्याचार आणि विनयभंग करत होते. त्याची दुसरी पत्नी त्याला त्याच्या वाईट कामात साथ देत होती. काही दिवसापूर्वी ती तिच्या बेडरूममध्ये तिच्या परीक्षेची तयारी करत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला अभ्यासासाठी फटकारले. तिला घरातील कामांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. जेव्हा तिने परीक्षेसाठी अभ्यास करू द्या, अशी विनंती केली तेव्हा वडिलांनी तिचे हॉल तिकीट फाडले.
मुलीने म्हटले आहे की, ती 12 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिच्यासमोर स्वत:ला उघड केले. तिने ही बाब तिच्या सावत्र आईच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तिने पतीला साथ दिली. तिने तिचे कपडेही काढले आणि वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिचे वडील दारू पिणारे असून अनेकदा तिच्याशी गैरवर्तन करतात. आरोपी वडिलांना आयपीसीच्या कलम ३५४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.