ताथवडे येथील छुप्या वेश्या व्यवसायावर कारवाई; एका अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ताथवडे येथील छुप्या वेश्या व्यवसायावर कारवाई; एका अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका

पिंपरी-चिंचवड, दि. 25 - पिंपरी-चिंचवड शहरातील छुप्या रितीने चालणाऱ्या व्यवसायांवर पोलिसांची वक्र दृष्टी पडली आहे. ताथवडे येथील एका लॉजवर सामाजिक सुरक्षा पथकाने धाड टाकून रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारावाईत अभिनेत्री आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. अत्रिनेत्री छत्तीसगडची तर एक तरुणी मुंबई व एक तरुणी राजस्थानची आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघा जणांना अटक करण्यात आली आहे तर तिघांचा तपास चालू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र बोकाडिया ऊर्फ हितेश ओसवाल ऊर्फ महेश उर्फ विकी, हेमंत साहु व त्यांचे साथीदार मुकेश केसवाणी, करण, युसुफ शेख उर्फ लंगडा यांच्या सांगण्यावरून जितेंद्र व हेमंत हे त्यांच्या मोबाईलवरून व्हॉटस अॅपवर कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवून देतात. त्या मुली त्यांच्या नावावरती रूम बुक करून ठेवतात अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून बनावट ग्राहक पाचारण करून पडताळणी करिता मुंबई-पुणे हायवेलगत, ताथवडे येथील लॉजवर पाठवून सापळा रचून छापा टाकण्यात आला. या वेळी तीन तरुणी आढळून आल्या. त्यांची सुटका करण्यात आली आहे.

कारवाई दरम्यान चौकशी केली असता पोलिसांना माहिती मिळाली की, एका मुलीची वेश्यागमनासाठी निवड करण्यास सांगून एका ग्राहकाकडून एका वेळेस 10 हजार ते 15 हजार रुपये, एका दिवसाचे 20 हजार ते 35 हजार रुपये व एका रात्रीचे 20 ते 40 हजार रुपये घेत असता. ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेतून प्रति ग्राहक फक्त 1,500 ते 2 हजार रुपये मुलांना देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत जात असे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकार, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (गुन्हे), काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सुमित डमाळ, अतुल लोखंडे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.