पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक   

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक   

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    पतीकडून दारु साठी पैशांची मागणी व सतत चारित्र्यावर घेतल्या जाणाऱ्या संशयामुळे पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हि घटना मंगळवारी (दि.1) मुळशी येथे घडली आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मयत विवाहितेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून पती कृष्णा शिवाजी उरिकडे (वय 40 रा. मुळ बार्शी, सोलापूर, सध्या मुळशी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला आरोपी हा 2013 पासून छळत होता. दारुच्या पैशांसाठी राहत्या घराची जमीन विकण्याचा तगादा लावून पीडितेला मारहाण करीत असे,तसेच पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन ही तो भांडत असे. मंगळवारी देखील त्यांच्यात असेच  भांडण झाले. पतीच्या या सततच्या जाचाला कंटाळून पीडीतेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.