क्रूझ ड्रग्ज प्रकरण हा भाजपचा कट- नवाब मलिक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

क्रूझ ड्रग्ज प्रकरण हा भाजपचा कट- नवाब मलिक


मुंबई - आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यावर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी एनसीबी झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्यामार्फत क्रूझ ड्रग प्रकरण हे “भाजपचे षडयंत्र ” असल्याचा पुनरुच्चार केला.ज्यामुळे महाराष्ट्र, महाराष्ट्रील लोक आणि बॉलीवूड इंडस्ट्रीची बदनामी झाली आहे.
“माझं ठाम मत आहे की महाराष्ट्र सरकारला, तेथील लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र,वानखेडेच्या माध्यमातून राबवले जात आहे आणि या सगळ्यामागे भाजपचा हात आहे.” असे मलिक म्हणाले.बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यावर हा कट सुरू झाल्याचे सांगताना,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये फिल्मसिटी निर्माण केल्याचा संदर्भ देत मलिक म्हणाले.“आमच्या बॉलीवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असुन ते मुंबईबाहेर उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे”
मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वारंवार “बनावट”म्हणून संबोधले असुन वानखेडेवर बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर यासह अनेक आरोप केले आहेत.मलिक यांनी “चित्रपट उद्योगाशी खेळ खेळण्यासाठी” केंद्राने वानखेडेला एनसीबीमध्ये कसे आणले यावर प्रकाश टाकला आहे.