रोहिंगे देशासाठी गंभीर धोकादायक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली -
रोहिंग्यांना परत पाठवले जाईल, असे नवीन शपथपत्र कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. बंगळुरूतील रोहिंग्यांना परत पाठवण्याची कोणतीही योजना नसल्याचे यापूर्वी कर्नाटकने स्पष्ट केले होते.
कर्नाटकातील 126 रोहिंग्यांची ओळख पटवण्यात आली आहे, असे कर्नाटकच्या गृह विभागाने शपथपत्रात म्हटले आहे. कर्नाटक पोलिसांनी या रोहिंग्यांना कोणत्याही शिबिरात ठेवलेले नाही, असेही कर्नाटकने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. देशात अवैधरीत्या वास्तव्य करणार्या सर्वच रोहिंग्यांना वर्षभरात परत पाठवण्यात यावे, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे. रोहिंगे देशासाठी गंभीर धोकादायक असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.