भाजपचा आमदार जुगार खेळताना पकडला गेला, कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अहमदाबाद, दि. 11 मे - गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील हलोल न्यायालयाने मातरचे भाजप आमदार केसरी सिंह सोलंकी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हलोल सत्र न्यायालयाने आमदाराला शिक्षा सुनावली. शिक्षेसोबतच हलोल सत्र न्यायालयाने आमदाराला चार हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
मातरचे आमदार केसरी सिंह यांना हलोलच्या फार्महाऊसवर जुगार खेळताना पकडण्यात आले. पोलिसांनी आमदार केसरी सिंह यांच्यासह २३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. एक वर्ष जुन्या या खटल्याचा आज हलोल सत्र न्यायालयामार्फत निकाल देण्यात आला. कोर्टात हजर झालेल्या 22 आरोपींना दोन वर्षांचा कारावास आणि चार हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. कोर्टात हजर असलेल्या सर्व 22 आरोपींना दोन वर्षांचा कारावास आणि चार हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गुजरातमधील भाजप आमदार केसरी सिंह यांना 2 जुलै 2021 रोजी इतर 23 जणांसह अटक करण्यात आली होती. हे रिसॉर्ट पंचमहाल जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पावागड परिसरातील शिवपुरी खाणीजवळ आहे. रिसॉर्टमध्ये महिलांसह एकूण 18 पुरुषही जुगार खेळत होते. याशिवाय पोलिसांनी रिसॉर्टमधून 7 दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.