दारूच्या नशेत घरात घुसून आमदाराच्या गाडीची तोडफोड, अंगणातील कुंड्यांची नासधूस

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दारूच्या नशेत घरात घुसून आमदाराच्या गाडीची तोडफोड, अंगणातील कुंड्यांची नासधूस

सांगली (प्रबोधन न्यूज) - सांगलीच्या जत शहरातील सावंत गल्लीतील काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गाडीवर एका तरुणाने दगडफेक करत हल्ला केला. ही घटना काल दुपारी घडली असून प्रतीक देशमाने असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. या पूर्वी काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला होता. आताही काँग्रेसच्याच आमदारांवर हल्ला झाला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रतिकचा मोबाईल हॅक करण्याच्या कारणावरुन दोघांसोबत त्याचा  वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्यांच्याबरोबर प्रतिकचा वाद झाला होता. रागाच्या भरात प्रतिकने त्या दोघांना तुम्ही कुठे आहे, असे विचारल्यावर त्यांनी आपण आमदार साहेबांच्या घरासमोर असल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रतिकने वडिलांना बॅंकेत सोडले आणि थेट आमदार सावंत यांच्या घराकडे धावला.

प्रतिक तिथे पोहलचा पण ते दोघे तिथे न दिसल्याने रागाच्या भरात त्याने आमदार सावंताच्या घराच्या आवारात घुसून त्यांच्या घरासमोरी कुंड्या घेऊन आदळाआपट केली, त्यांच्या गाडीचेही मोठे नुकसान केले. सुदैवाने एका विवाह समारंभाच्या निमित्ताने आमदार सावंत हे मतदारसंघात गेले होते.

सावंत यांच्या घरातील शिपाई आणि रखवालदारांनी प्रतिकला अडवण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिक नशेत असल्यामुळे कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण सावंत यांना घडला प्रकार समजताच त्यांनी प्रतिकला सोडून देण्याची सूचना जत पोलिसांना केली.