ED आणि CBI चा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर थेट निशाणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ED आणि CBI चा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर थेट निशाणा

  मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -    एके ठिकाणी अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या बैठका सुरू होत्या. प्रत्येक गटातील मातब्बर नेते आपली भूमिका मांडत होते. शरद पवार यांच्या गटातून खासदार अमोल कोल्हे यांनी आपली शरद पवारांसोबतचं आपलं नातं उलगडलं. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका होत आहे. कोल्हे कोणत्या गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा सुरू होती. मात्र आज ते शरद पवारांच्या बैठकीत सामील झाले.

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, पाऊस पडला की चिखल होतो. ED आणि CBI चा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. मन लावून भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता. आज अनेक जणं म्हणतील की आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं. मात्र बडव्याचं कारण का द्यावा,, कारण त्यांना विठ्ठल कळाच नाही. मनातून निस्सिम भक्ती केली असती तर पांडूरंग पावला असता. त्या दिवशी मी स्वत: राजभवनात होतो. त्यावेळी सांगितलं की, मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. कारण काय कारण जर या पद्धतीने पक्ष फोडले गेले तर राजकारणातील नैतिकता सर्वसामान्यांनी विश्वास ठेवून जे मतदान केलं, त्याचं काय होणार?

मी आतापर्यंत कधी असं एकलं नाही की माझ्या बापानं निष्ठा विकली, मला रोज पंचपक्वान दिलं असं कोणता मुलगा अभिमानानं सांगताना कधी ऐकलं नाही, मात्र माझ्या बापाने स्व कष्टानं चटणी भाकरी दिली, असं सांगणं ही संस्कृती महाराष्ट्राची आहे. नवीन कार्यालयाचं नाव वाचून अनेक प्रश्न निर्माण झाले. नव्या कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात आलं. मात्र त्यांनी एकदा प्रतापगडाचा इतिहास पाहावा. आणि कानोजी जयदाचा आदर्श घ्यावा. ही लढाई गुरू शिष्यची नाही. धर्मावर अधर्माची आहे.