तालिबान्यांच्या निषेधार्थ ‘एसएनबीपी’चा पुढाकार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तालिबान्यांच्या निषेधार्थ ‘एसएनबीपी’चा पुढाकार
तालिबान्यांच्या निषेधार्थ ‘एसएनबीपी’चा पुढाकार

महिलांवरील अन्यायाविरोधात ‘रेड कार्ड’ मोहीम;

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी - अफगानिस्तान सरकारमध्ये असलेल्या तालिबान्यांनी तेथील महिलांना शिक्षणासह इतर प्रमुख प्रवाहापासून दूर ठेवण्याचे धोरण राबविले आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय युवा संयुक्त परिषदेने जागतिक पातळीवर ‘रेड कार्ड’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमध्ये आज (दि. ११) मोरवाडी येथील एसएनबीपी विधी महाविद्यालयाच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ‘रेड कार्ड’ दाखवून तालिबानी धोरणांचा निषेध नोंदविला.

या मोहिमेसाठी महाविद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष डी. के. भोसले, संचालिका वृषाली भोसले, प्राचार्या डॉ. रोहिनी जगताप यांच्यासह कैलास पोळ, स्वप्नील जाधव, प्रिया तोतले, सोनाली देशमुख, पायल चौधरी तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी तर भारतीय युवा संयुक्त परिषदेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रशांत गुरव, शुभम काशिकर, अक्षय वायदंडे, विद्या अंबुरे उपस्थित होते.

अफगानिस्तामध्ये तालिबान्यांचे शासन आल्यापासून तेथील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण, नौकरीसह इतर मुख्य प्रवाहांपासून महिलांना जाणिवपूर्वक दूर ठेवले जात आहे. महिलांना हिन दर्जाची वागणूक दिली जात आहे. त्या विरोधात भारतीय युवा संयुक्त परिषदेने ‘रेड कार्ड’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोहिम हाती घेतली आहे. संपूर्ण भारतातही ही मोहीम राबविली जात आहे. पुण्यामध्ये ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी एसएनबीपी विधी महाविद्यालयाने पुढाकार घेत आज ही मोहीम राबविली.

सकाळी नऊ वाजता विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी रेड कार्ड दाखवून तालिबान्यांच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यानंतर स्वाक्षरी मोहीम राबवून भारतीय युवा संयुक्त परिषदेच्या मोहिमेला पाठींबा दिला.

पुण्यामध्ये एसएनबीपीचा पुढाकार

तालिबान्यांच्या अन्यायाविरोधात भारतीय युवा संयुक्त परिषदेने सुरू केलेल्या रेड कार्ड मोहिमेला पाठींबा देत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणारे एसएनबीपी हे पुण्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील चांगल्या उपक्रमांना एसएनबीपीचा नेहमीचा पाठींबा राहिला आहे. महिलांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी एसएनबीपीने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या प्रसंगी रोहिणी जगताप (प्रिन्सिपल), कैलाश पॉल (असि. प्रोफेसर), भीमराव जाधव (असि. प्रोफेसर), मारूती राशिवडेकर (ग्रंथपाल), प्रिया टोटले (असि. प्रोफेसर), सोनल देशमुख (असि. प्रोफेसर), मोनिका शेखावत (असि. प्रोफेसर), पायल चौधरी (लेक्चरर), सुश्मिता कुमारी (लेक्चरर), ओमकार कोरावले (असि. प्रोफेसर), डॉ. उज्ज्वला भारती (असि. प्रोफेसर) व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होेत.